ब्रिटननं तयार केलं पहिलं उलटं घर, पाहून धक्काच बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 09:51 PM2018-11-15T21:51:06+5:302018-11-15T21:54:16+5:30

घराची संकल्पना प्रत्येकाची वेगवेगळी असते. परंतु ब्रिटनमध्ये एक उलटं घर बनवण्यात आलं आहे.

ब्रिटनमधलं हे पहिलं अपसाइड डाऊन हाऊस असून, ते पाहण्यासाठी पर्यटकांची रिघ लागत आहे.

ब्रिटनमधलं हे अनोखं घर फक्त 11 दिवसांत तयार करण्यात आलं आहे.

2019मध्ये ते पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार आहे. जेणेकरून पर्यटकांना घराच्या आतून उलटं जग पाहता येईल.

जोसुद्धा या घरात प्रवेश करेल तो संभ्रमात तर नक्कीच पडेल.

कारण या घरातील सर्वच गोष्टी उलट्या आहेत.