ब्राझीलमध्ये रिओ कार्निव्हलचा उत्साह !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 11:56 PM2018-02-13T23:56:08+5:302018-02-14T00:10:10+5:30

ब्राझीलमध्ये रिओ कार्निवलचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी सांबास्क्वेअरमध्ये सांबा डान्स क्लबच्या कलाकारांनी आपापले नृत्यप्रकार सादर केले.

ब्राझीलमध्ये होणारा कार्निवल हा जगातला सर्वात मोठा आणि लोकप्रिय महोत्स्व मानला जातो.

ब्राझीलच्या संस्कृतीचा आज हा अविभाज्य घटक बनला आहे. काही दिवस चालणारा कार्निवलचा मुख्य कार्यक्रम फेब्रुवारीमध्ये पार पडतो.

कार्निव्हल म्हणजे एक सार्वजनिकरित्या साजरा केला जाणारा समारंभ ज्यात लोक सर्कशीच्या धर्तीवर मुखवटे परिधान करतात, सार्वजनिक ठिकाणी खुली पार्टी करतात.

ब्राझीलप्रमाणे जगभर अन्य शहरांतही कार्निव्हल साजरा केला जातो, भारतातही गोवा, गुजरात, ओडिशा आणि केरळमध्ये कार्निव्हल साजरा केला जातो. गोव्यात कार्निव्हल इन्त्रुज या नावाने साजरा केला जातो.

कार्निव्हलमध्ये सांबा स्कूलचे कलाकार सांबाड्रोमध्ये नृत्य सादर करतात, देशभरातूनच नव्हे परदेशातून लाखो पर्यटक याचा आनंद लुटण्यासाठी येतात.