थंडीमुळे तलावातील पाण्यासोबत मगरीही गोठल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 12:57 PM2018-01-10T12:57:23+5:302018-01-10T12:59:24+5:30

अमेरिकेत थंडीने कहर केला असून, पार्कमधील या तलावातील पाणी थंडीमुळे गोठलं आहे. विशेष म्हणजे पाण्यासोबत मगरीदेखील गोठल्या आहेत.

अमेरिकेतील शॅलोट्टे रिव्हर स्वॅम्प पार्कमध्ये हे चित्र पाहायला मिळतं आहे.

वातावरणात बदल झाल्यानंतर मगरदेखील त्या बदलात सहजपणे वावरु शकतात.

जेव्हा त्यांना वाटतं की पाणी गोठणार आहे तेव्हा त्या आपलं नाक पाण्याबाहेर काढून निद्रावस्थेत जातात. बर्फ वितळेपर्यंत शरिराचं तापमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न त्या करतात.