विश्व हॉकी लीग फायनल: भारताचा जर्मनीकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 03:35 PM2017-12-05T15:35:28+5:302017-12-05T15:39:33+5:30

वेगवान सुरुवात करणारा भारतीय संघ विश्व हॉकी लीग फायनलच्या अखेरच्या साखळी सामन्यात सोमवारी जर्मनीकडून मात्र ०-२ ने पराभूत झाला.

कलिंगा स्टेडियमवर जर्मनीकडून हेनर मार्टिनने १७ व्या तसेच मॅट्स ग्रॅमबुशने २० व्या मिनिटाला गोल केले.

ऑस्ट्रेलियाला १-१ असे बरोबरीत रोखल्यानंतर इंग्लंडकडून भारतीय संघ २-३ ने पराभूत झाला.

जर्मनीची बचावफळी भक्कम मानली जाते. आज ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली.

टॅग्स :हॉकीHockey