World Water Day 2019 : सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने 'हे' 5 आजार राहतात दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 03:05 PM2019-03-22T15:05:13+5:302019-03-22T15:12:14+5:30

जर तुमची सकाळ बेड टी किंवा ब्लॅक कॉफीपासून होत असेल तर कदाचित तुम्हाला पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्ही सकाळी उठल्यावर बेड टी किंवा कॉफीऐवजी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्यायलात तर तुमचं एक नाही तर पाच आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. आज जागतिक जलदिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया काहीही खाण्याआधी रिकाम्यापोटी पाणी पिणं का आवश्यक असतं त्याबाबत...

सकाळी उठल्यानंतर पअनोशापोटी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्नात असाल तर तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरत. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी पाणी पिण्यास सुरुवात करा.

अनोशापोटी पाणी प्यायल्याने शरीरातील सर्व घाण स्वच्छ होण्यास मदत होते आणि रक्त स्वच्छ होण्यासही मदत होते. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी पिण्यास सुरुवात करा आणि हळूहळू याचं प्रमाण वाढवा. यामुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने नवीन पेशी तयार होतात. याव्यतिरिक्त स्नायू बळकट होण्यासही मदत होते.

जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्टाच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. सकाळी पोट साफ झाल्यामुळे तुम्ही केलेल्या नाश्त्यातील पूर्ण पोषक तत्व मिळण्यास मदत होते.

सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने गळा, डोळे तसेच किडनीचं आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. तसेच शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. (टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)