World Mosquito Day 2018 : मच्छरांच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 12:30 PM2018-08-20T12:30:54+5:302018-08-20T12:38:33+5:30

दरवर्षी 20 ऑगस्ट हा दिवस जागतिक मच्छर दिवस साजरा करण्यात येतो. हा दिवस डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्या आठवणींमध्ये साजरा केला जातो. डॉक्टर रोनाल्ड यांनी 1897मध्ये संक्रमण झालेली मादा मच्छर चावल्यामुळे मलेरिया सारखा जीवघेणा आजार होतो, याचा शोध लावला होता. या दिवसानिमित्त जाणून घेऊयात मच्छरांबाबत काही खास गोष्टी...

एक मच्छर एकावेळी 0.1 मिलीलीटर रक्त शोषून घेतो.

मादा मच्छरांचं आयुष्य हे नर मच्छरांच्या आयुष्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास 2 महिने असतं.

मच्छर आपल्या वजनापेक्षा तीन पटींनी जास्त रक्त एकावेळी शोषून घेतात.

प्रत्येक वर्षी डेंग्यू आणि मलेरियासारख्या मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे देशभरात हजारो लोकं मरण पावतात.

एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, मलेरियामुळे जगभरात प्रतिवर्षी 10 लाख लोकं मरण पावतात.

आफ्रिकेमधील देशांमध्ये मच्छरांमुळे होणाऱ्या आजारांमुळे सर्वात जास्त लोकांचे प्राण जातात.