वेळीच व्हा सावध ! जाणून घ्या जेवण न करण्याचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 03:37 PM2018-12-06T15:37:32+5:302018-12-06T15:47:52+5:30

1.धावपळीच्या आयुष्यात आपल्याला बऱ्याचदा जेवणासाठी वेळच मिळत नाही. तर अनेकदा काही किलो वजन घटवण्याच्या नादात आपण मुद्दाम जेवण टाळतो. पण, या सवयीची तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

2. लक्ष्य केंद्रीत होत नाही : ग्लुकोजच्या मदतीनं आपल्या मेंदूचे कार्य सुरू असते. यामुळे योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण न जेवल्यास रक्तातील साखरेची पातळी खालावते आणि आपण आपले लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता गमावू शकता.

3. चिडचिड होते : बऱ्याचदा भुकेमुळे आपली जास्त चिडचिड होते, हा अनुभव प्रत्येकानं घेतला असेलच. रक्तातील साखरेची पातळी खालावल्यानं मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो. तुमची मनःस्थिती मिनिटा-मिनिटाला बदलते. पोटात जेवण न गेल्यानं काहींना प्रचंड राग येतो, चिडचिड होते तर अस्वस्थही वाटते.

4. प्रमाणाबाहेर खाणे : वेळच्या वेळेत जेवण न झाल्यानं बरेच जण दिवसा अखेरीस प्रमाणाबाहेर खाणे पोटात ढकलतात. भूक असताना खाद्यपदार्थ पोटात न गेल्यास अनेकांना नंतर भूक न लागण्याचा आजार होऊ शकतो. तर काही जणांना प्रमाणाबाहेर खाण्याची सवय लागते. त्यामुळे वजन घटवण्याचा कितीही प्रयत्न केल्यास तुमच्या प्रयत्नांना यश येणार नाही.

5. वजन वाढते : वेळेत जेवण न करण्याचा वाईट परिणाम तुमच्या चयापचय प्रक्रियेवरही होऊ शकतो. याची मोठी किंमत तुमच्या शरीरालाच चुकवावी लागते. चयापचय प्रक्रियेवर परिमाण झाल्यानं फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते.

6. चक्कर येणे : भुकेले राहिल्यानं अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.

7.तणाव येणे : भुकेल्या अवस्थेत असताना आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे आपल्याला तणाव जाणवू लागतो.

8. अन्य आजारांना आमंत्रण : जेवण सोडल्यानं कोणतीही शारीरिक समस्या निर्माण होणार नाही, असे तुम्हाला वाटत असल्यास तो तुमचा गैरसमज आहे. वजन घटवायचं असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतरानं खात राहा

9.योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार आणि व्यायाम करणंच तुम्हाला मदत करू शकेल.