या गोष्टी करू शकतात तुमची पावसाळ्यातील मजा खराब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 04:07 PM2018-06-27T16:07:57+5:302018-06-27T16:39:30+5:30

पावसाळा हा सर्वांनाच हवा हवासा वाटतो. मात्र या ऋतुमध्ये खाण्यापिण्याची योग्य काळजी न घेतल्यास तुमचा पावसाळ्यातील आनंद खराब होऊ शकतो. पावसाळ्यातील पथ्यपाण्याविषयी जाणून घ्या पुढील स्लाइडमध्ये.

पावसाळ्यामध्ये टरबूज आणि कलिंगडासारखी फळे खाणे टाळले पाहिजे.

पावसाळ्यामध्ये लिंबू, टोमॅटो अशी आंबट फळे खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी दह्यासारखे पदार्थ आवर्जुन खाल्ले पाहिजेत.

पावसाळ्यात उष्णता मिळवण्यासाठी चहा, कॉफीचे अधिकाधिक सेवन केले जाते. मात्र चहा आणि कॉफीच्या अधिक सेवनामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत शरीराला डिटॉक्सीफय करण्यासाठी पाण्याचे अधिक सेवन केले पाहिजे.

पावसाळ्यात पकोड्यासारखे तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र त्यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे.