'या' घरगुती वस्तुंचा तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापर करताय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 12:52 PM2018-10-19T12:52:08+5:302018-10-19T13:03:32+5:30

टेक्नॉलॉजी आज आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग झाली आहे. दैनंदिन जीवनात टेक्नॉलॉजीच्या वापराने आपल्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण त्यासोबतच याचे काही दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागत आहेत. अनेकजण काही टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करुनही स्वत:चं नुकसान करुन घेत आहेत. त्यामुळे यापुढे जर तुम्ही या वस्तू वापरल्या तर त्यासाठी काही टिप्स आम्ही सांगणार आहोत.

फूड कंटेनर्स - अनेकांमध्ये हा फारच मोठा गैरसमज आहे की, स्टीलची भांडी सोडून इतर सर्व प्रकारचे फूड कंटेनर मायक्रोवेव्हमध्ये ठेवून पदार्थ गरम केले जाऊ शततात. पण त्या कंटेनरचं प्लास्टिक गरम होऊन जेव्हा पदार्थांच्या संपर्कात येतं तेव्हा ते टेस्टोस्टेरॉन आणि अॅस्ट्रोजन लेव्हलला प्रभावित करतं. याने कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये नेहमी मायक्रोवेव्ह सुरक्षित आणि हीटप्रूफ कंटेनर्सच वापरा.

रेफ्रिजरेटर - प्रत्येक फळ किंवा भाजी फ्रिजमध्ये ठेवल्याने चांगल्या राहतातच असं नाहीये. कारण त्यांचा ताजेपणा निघून जातो. आले हे फ्रिजमध्ये फार लवकर खराब होत. त्यामुळे हे खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर फ्रिजची ह्युमिडीटी सेटींग कमी ठेवा, याने नुकसान कमी होईल.

कंगवा - तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण तुम्ही केसांसाठी कंगव्याचा जितका कमी वापर कराल तितका तुम्हाला फायदा होईल. कारण असे केल्याने केस कमी तुटतील. याचा अर्थ हा नाही की, केस करण्यासाठी कंगवाच वापरु नये. योग्य प्रकारे त्याचा वापर केला तर तुमचं नुकसान होणार नाही.(Image Credit : mannamydlo.cz)

किचन स्पंज - किचन स्पंजची स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे. हा स्पंज स्वच्छ करण्यासाठी २ ते ३ दिवसांच्या अंतराने हा स्पंज गरम पाण्याच बुडवून ठेवा. याचा वापर करत असतानाही याला गरम पाण्यात बुडवून ठेवणे गरजेचे आहे. असे केल्याने भांड्यांमध्ये किटाणू होणार नाहीत.

टूथपेस्ट - अनेकांना वाटतं की जास्त टूथपेस्ट वापरल्याने दात जास्त चांगले स्वच्छ केले जातात. पण डेंटिस्ट्सनुसार, टूथपेस्ट केवळ एका वाटाण्याच्या दाण्याइतका वापरावा. तसेच फार जास्त वेळ ताकद लावून दात स्वच्छ करणेही चुकीचे आहे. तसे केले तर तुमच्या हिरड्यांना समस्या होऊ शकते.

डिटर्जेंट पावडर - काही लोक असा विचार करतात की, कपडे धुण्यासाठी जास्त डिटर्जेंट पावडर वापरल्याने कपडे अधिक चांगले स्वच्छ होतीत. डिटर्जेंट पाकीटाच्या मागच्या बाजूस ते किती वापरावं याचं प्रमाण दिलेलं असतं. ते तितकच घ्यायला हवं. जास्त डिटर्जेंटचा वापर केल्याने कपडे डॅमेज होण्याचा धोका अधिक असतो.