...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 05:30 PM2018-10-05T17:30:41+5:302018-10-05T17:40:09+5:30

अनेकदा असं होतं की, आपण एखाद्या ठिकाणी बसल्यावर फक्त आपल्यालाच डास चावतात. आपल्यासोबतच्या इतर व्यक्तींवर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही. मग असं का होतं? यामागे काही कारणं आहेत.

तुम्हाला जास्त घाम येतो का? घामाच्या वासाकडे डास जास्त आकर्षित होतात. त्यामुळे ज्या लोकांना जास्त घाम येतो त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक डास चावतात.

लोवा स्टेट यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ एंटोमोलॉजीने केलेल्या एका रिसर्चनुसार, डास बॉडी टेंम्परेचर जास्त असणाऱ्या माणसांना जास्त चावतात.

तुम्ही परफ्युम जास्त वापरत असाल तर तुम्हाला डास जास्त चावतील. कोणत्याही प्रकारचा गंध डासांना आपल्याकडे आकर्षित करतो.

यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियानुसार, जास्तीत जास्त लोशन आणि क्रिम्समध्ये लॅक्टिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे डास जास्त आकर्षित होतात.

यूनिवर्सिटी ऑफ नेब्रास्का, लिंकन, यूएसएच्या संशोधनानुसार, डार्क रंग म्हणजेच ब्लॅक, लाल रंगाचे कपडे घातलेल्यांकडेही डास जास्त आकर्षित होतात.