हलकीफुलकी इडली खा अन् वजन घटवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:03 PM2019-05-09T15:03:33+5:302019-05-09T15:07:41+5:30

इडली शरीरासाठी उत्तम असते. दिसायला हलकीफुलकी असणारी इडली सहज पचते. याशिवाय वजन कमी करण्यातही फायदेशीर ठरते.

इडली वाफेवर तयार होते. इडलीत कमी कॅलरीज असतात. तुम्हाला इडलीतील अतिरिक्त तांदळाची चिंता वाटत असेल, तर त्याऐवजी डाळी वापरता येऊ शकतात.

इडली पचण्यास अतिशय हलकी असते. इडलीचं पीठ आंबवून तयार केलं जातं. त्यामुळेच ती सहज पचते.

इडली मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन्स असतात. त्यामुळे बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.

इडलीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं ती अतिशय सहजपणे पचते. त्यामुळे वजनदेखील कमी होतं.

संत्र किंवा द्राक्षाच्या ज्युससोबत इडली खाल्ल्यास चरबी कमी होते.

इडलीमध्ये लोहदेखील मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे दररोज इडली खाल्ल्यास शरीराची लोहाची गरज पूर्ण होते.

इडली शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स अतिशय कमी आहेत. त्यामुळे ती आरोग्यासाठी उत्तम असते.