अॅसिडिटीमुळे आहात हैराण? करा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 02:52 PM2018-08-07T14:52:12+5:302018-08-07T14:55:58+5:30

आल्यामध्ये व्होलाटाईल ऑईल असतं ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होत नाही. पाण्यामध्ये आले उकळावे आणि ते पाणी प्यावे. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते.

अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते खावे आणि पाणी देखील प्यावे. यामुळे पोटाच्या समस्या सुटण्यास मदत होते.

जेवणानंतर बडीशेप चावून खावी. शिवाय, पाण्यासोबतही याचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे पोटात होणारी जळजळ शांत होण्यास मदत मिळते.

फायबर्सचा उत्तम स्त्रोत म्हणून केळ्याकडे पाहिले जाते. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास केळ्याचे सेवन वाढवावे.

पदार्थ योग्यरित्या चावून न खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होतो. शिवाय, यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होतो. यामुळे हळू आणि योग्य पद्धतीनं चावून खास खाल्ला पाहिजे.

कधी-कधी ताणतणावामुळेही पचनक्रियेवर परिणाम होतो. ताणतणावापासून मुक्ती मिळावी यासाठी योग, व्यायाम केला पाहिजे.

खाताना थंड पाण्याचे सेवने करणं ही सवय आरोग्यास हानिकारक आहे. जेवण पूर्ण झाल्यानंतरच पाणी प्यावे.