50 टक्क्यांहून अधिक तरुण 'कूल' दिसण्यासाठी ओढतात सिगारेट

By ऑनलाइन लोकमत on Wed, December 06, 2017 2:45pm

देशभरातील 50 टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते.
एका सर्व्हेक्षणानुसार, 52 टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे. तर 90 टक्के तरुणांनी सांगितलं आहे की, जर त्यांच्या आई-वडिलांनी धुम्रपानास विरोध केला नाही तर ते धुम्रपान करणं सुरु ठेवतील.
80 टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहे.
सर्व्हेत सहभागी झालेल्या 75 टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा कधी त्यांचे मित्र सिगारेट पिण्यासाठी आग्रह करतात, तेव्हा त्यांना नकार देणं कठीण जातं. 46 टक्के विद्यार्थ्यांनी तर आपण मित्रांमध्ये कूल दिसावं यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्याचं कबूल केलं आहे.

हेल्थ कडून आणखी

उपाशी पोटी 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका
उत्तम आरोग्यासाठी हे 5 पदार्थ दररोज खा...
मायग्रेनचा त्रास होतोय??? मग हे करा उपाय
'या' सात गोष्टींमुळे वाढतो कॅन्सर होण्याचा धोका
फिटनेस फ्रीक आहात तर या गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

आणखी वाचा