या ५ गोष्टी तुम्ही वॅाशरूममध्ये घेऊन जात असाल तर सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 05:00 PM2018-02-17T17:00:59+5:302018-02-17T17:13:51+5:30

१) मोबाईल - स्वत:चा मोबाईल नकळतपणे आपण वॅाशरूममध्ये घेऊन जातो. त्यातूनच काहींना वॅाशरूममध्ये सेल्फी काढण्याची सवय असते. वॅाशरूममध्ये मोबाईल हाताळल्यामुळे तिथे असलेल्या जंतू आणि जीवाणूंचा मोबाईलशी संसर्ग होतो. मोबाईल आपली रोजची हाताळण्याची वस्तू असल्याने ते जंतू आपल्या हातालाही लागतात.

२) मेकअपचं साहित्य - बहुतेक मुलींना वॅाशरूममध्ये जाऊन मेकअप करण्याची सवय असते. या मेकअपच्या वस्तूंमध्ये काजळ, लिपस्टिक अशाच वस्तूंचा वापर जास्त होतो. त्यामुळे डोळ्याचा व चेहऱ्याचा वॅाशरूममध्ये असलेल्या आरशाशी जवळून संपर्क आल्याने तुमच्या चेहऱ्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

३) खाण्याच्या वस्तू - वॅाशरूममध्ये स्वत:ची बॅग किंवा खाऊची पिशवी घेऊन जात असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. वॅाशरूममध्ये खाण्याचे पदार्थ घेऊन गेल्याने तिथे असलेल्या जीवाणूंचा तुमच्या बॅगमध्ये असलेल्या पदार्थाशी संपर्क होतो. व त्या पदार्थामार्फत जंतू तुमच्या पोटात जाऊन पोटाचे विकार होऊ शकतात.

४) चहा अथवा कॅाफी - काहींच्या मते चहा व कॅाफी वॅाशरूममध्ये प्यायल्याने पोट साफ होतं. जर तुम्हीही असं करत असाल तर तुम्ही अनेक आजारांना निमंत्रण देत आहात. चहा व कॅाफीचं सेवन वॅाशरूममध्ये केल्याने जीवाणूंशी संपर्क तर होतोच पण तुमच्या पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो.

५) हातातील वस्तू - वॅाशरूममध्ये जाताना आपल्या हातात असलेलं घड्याळ, अंगठी यांचाही जवळचा संबंध येतो. त्यामुळे वॅाशरूमचा वापर केल्यावर हात स्वच्छ धुवावे व हातातील वस्तूही व्यवस्थित पुसून घ्यावा, जेणेकरून तुमचे हात स्वच्छ राहतील.

टॅग्स :आरोग्यHealth