स्वत:ला कसा फिट ठेवतो जॉन अब्राहम? जाणून घ्या त्याचा फिटनेस फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:37 PM2018-12-17T13:37:00+5:302018-12-17T13:48:35+5:30

जॉन अब्राहम हा बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि हेल्दी स्टार्सपैकी एक आहे. आज जॉन आपला ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. मॉडलिंगच्या दुनियेतून बॉलिवूडमध्ये पाऊसल ठेवणारा जॉन स्वत:ला फिट कसा ठेवतो हे अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही जॉनचा फिटनेस फंडा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (All Photos Credit : John Abraham Instagram)

मॉडलिंग आणि जाहिरातीच्या विश्वात लोकप्रियया मिळवल्यावर २००३ मध्ये 'जिस्म' या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. जॉन सांगतो की, हेल्थ आणि वर्कआउट करण्यापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाहीये.

जॉनच्या डाएटबाबत सांगायचं तर तो त्याच्या प्री-वर्कआउट ब्रेकफास्टमध्ये जॉन ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टीसोबत ४ अंडी किंवा एक बटाटा किंवा एक रताळं, ब्राऊन ब्रेड आणि १ सफरचंद खातो.

पोस्ट वर्कआऊट म्हणजेच वर्कआउट केल्यावर ब्रेकफास्टमध्ये जॉन ६ ते ७ अंडीसोबत प्रोटीन शेक घेणे पसंत करतो. त्यासोबतच ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फ्रॅक्टोजने भरपूर पदार्थही खातो. त्यासाठी तो जास्तीत जास्त फळं खातो.

दुपारच्या जेवणात जॉन चपाती, स्टीम्ड फिशसोबत ३-४ स्लाइस, भाज्या, डाळ, दही आणि गाजर खातो. सायंकाळच्या नाश्त्यात उकळलेला बटाटा, संफरचंद, संत्री, पपई किंवा मोसंबीपैकी कोणतही एक फळ. डिनरमध्ये बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाणे पसंत करतो. सांयकाळी ५ नंतर जॉन कोणत्याही प्रकारचं कार्बाहायड्रेट खात नाही आणि तो ९ वाजताच्या आतच रात्रीचं जेवण करतो.

जॉनच्या ओव्हरऑल डाएटबाबत सांगायचं तर यात ५० टक्के प्रोटीन, २० टक्के कार्बोहायड्रेट, २० टक्के फायबर आणि १० टक्के अॅंटी-ऑक्सिडेंट व आवश्यक फॅटचा समावेश असतो.

वर्कआउटबाबत सांगायचं तर जॉन सांगतो की, त्याच्या आगामी सिनेमात त्याचा रोल काय आहे. त्यानुसार त्याचा एक्सरसाइज आणि वर्कआउटचा प्लॅन ठरतो. पण काही गोष्टी कधी बदलत नाहीत. जॉन सांगतो की, एक्सरसाइज हा जीवनाचा महत्त्वाचा भागच नाही तर जीवन जगण्याची पद्धत असली पाहिजे. त्यासाठी दररोज एक्सरसाइझ करावी.