हिवाळ्यात जलदगतीनं वजन वाढतंय?, जाणून घ्या या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:02 PM2018-11-19T14:02:28+5:302018-11-19T14:06:19+5:30

व्यायाम न करणं : वातावरणात गारवा असल्याच्या कारणामुळे लोकांची घराबाहेर पडण्यास तयारी नसते. यामुळे व्यायामामध्ये अडथळा येतो.

जास्त झोपणे : हिवाळ्यात लोक अधिक काळ झोपतात, यामुळे वजन वाढते.

आहार : हिवाळ्यात लोक मसालेदार-चटकदार पदार्थांचे अधिक सेवन करतात. यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज् निर्माण होतात.

गोडपदार्थांचं सेवन करणं : हिवाळ्यात अधिकाधिक गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते, ही सवयदेखील वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

अन्य खाद्यपदार्थ : या ऋतूमध्ये चॉकलेट, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थ खाणे नियमानं टाळा.

मेटाबॉलिज्म कमी होणं : थंड ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म स्तर कमी होतो, यामुळे अनेकांचं वजन वाढते.