श्वसनासंबंधी आजार दूर करण्यासाठी मदत करतील 'हे' 5 पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 03:22 PM2018-09-19T15:22:54+5:302018-09-19T15:33:05+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यूएचओनुसार, दरवर्षी जवळपास 3 मिलियन लोकं श्वसनासंबंधी आजारांनी पीडित होतात. दूषित हवा आणि धकाधकीचा दिनक्रम तुमच्या फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

लसणामध्ये असलेली एलिसिन आणि फायटोन्यूट्रिएंट यांसारखी तत्वे आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. यामध्ये अॅन्टीमायक्रोबायल, अॅन्टी-कॅन्सर आणि ब्लड प्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. चीनमधील वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, लसूण फुफ्फुसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहे.

पालक व्हिटॅमिन आणि खनिज तत्वांचा भंडार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वैज्ञानिकांना असं आढळलं की, पालकामध्ये असलेलं फोयटोकेमिकल्स शरीरातील सूज कमी करण्याचं आणि कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात.

सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि फायटोकेमकल्स (कॅटेचिन, क्लोरोजेनिक अॅसिड आणि फ्लोरिडजिन) मुबलक प्रमाणात आढळून येतात. यामुळे अस्थमा, कॅन्सर, शरीरातील सूज आणि हृदयाचे विकार यांवर उपाय म्हणून फायदेशीर ठरतात.

सर्दी आणि गळ्याच्या तक्रारींवर उपायकारक ठरणारं आलं श्वसनासंदर्भातील आजार दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. आल्यातून येणाऱ्या गंधाचं कारणही त्यातील जिंजरोल हेच असतं. जिंजरोल अस्थमा, सर्दी, मायग्रेन आणि उच्च रक्तदाब थांबवण्यास मदत करतं.

ब्रोकोलीमधील तत्व आरोग्यासाठी लाभदायी असतात. वैज्ञानिकांनुसार, ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन (एसएफएन) नावाचं तत्व मुबलक प्रमाणात आढळून येतं. ज्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, अॅन्टी-इफ्लेमेटरी, अॅन्टी-कॅन्सर आणि अॅन्टीमिक्राबियल गुण असतात. त्यामुळे दररोज अर्धा कप ब्रोकोलीचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं.