'वजन'दार व्हायचंय? हे पदार्थ नक्की खा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 02:46 PM2019-03-25T14:46:08+5:302019-03-25T14:49:48+5:30

भात- दररोज रात्रीच्या जेवणात बटर राईस खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

पीनट बटर- पीनट बटरमुळे वजन वाढतं. शेक्स, स्मूदीज आणि ब्रेडसोबत पीनट बटर खाल्ल्यास फायदा होतो.

आंबा आणि दूध- महिनाभर गरम दूधासोबत आंबा खाल्ल्यास वजन वाढतं. दिवसातून दोन-तीन वेळा गरम दूधासह आंबा खाल्ल्यास फायदेशीर ठरतो.

मध आणि केळं- मधासोबत केळं खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

तळलेले काजू- काजू घीमध्ये सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा. आठवड्यातून दोन वेळा असे काजू खाल्ल्यास वजन वाढतं.

अंजीर आणि मनुके- 30 ग्रॅम मनुके आणि सुकवलेली 6-7 अंजीर रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी ते खा. महिन्याभरात तुमच्या वजनात वाढ होईल.

क्लॅरीफाईड बटर- एक चमचा क्लॅरीफाईड बटर एक चमचा साखरेसोबत मिसळा. दिवसातून दोनवेळा जेवणानंतर सेवन करा.

बटाटा- दररोज उकडलेले बटाटे खा. एक किंवा दोन महिने उकडलेले बटाटे खाल्ल्यास वजन वाढण्यास मदत होते.

केळं आणि दूध- दररोज सकाळी एक केळं खा. त्यानंतर त्यात एक चमचा मध घातलेलं गरम दूध प्या.