गरमागरम चहा पिताय?; मग 'हे' नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 02:27 PM2019-03-26T14:27:02+5:302019-03-26T14:29:39+5:30

अनेकांना गरमागरम चहा पिण्याची सवय असते. मात्र यामुळे इसॉफेगस कॅन्सर होण्याचा धोका असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.

गरमागरम चहा पिण्याची सवय प्यायला अनेकांना आवडतो. या चहाचं तापमान साधारणत: 75 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

काहीजण चहा कपात ओतल्या ओतल्या लगेच पिण्यास सुरुवात करतात. मात्र असं न करता 4 मिनिटं चहा थांबल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

अमेरिकेच्या कॅन्सर सोसायटीचे मुख्य लेखक फरहद इस्लामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरमागरम चहा किंवा अन्य पदार्थांचं सेवन कॅन्सरचं कारण ठरू शकतं. यामुळे इसॉफेगस कॅन्सर होऊ शकतो.

जवळपास 50,045 लोकांचा या अभ्यासात विचार करण्यात आला. त्यांचं वय साधारणत: 40 ते 75 वर्षांच्या दरम्यान होतं. चहा प्यायल्यानं ग्रासनली कॅन्सरचा धोका 90 टक्क्यांनी वाढतो, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला.

ग्रासनली कॅन्सर हा देशातील सहाव्या क्रमांकाचा मोठा कॅन्सर आहे. यामध्ये महिलांचं प्रमाण मोठं आहे.