शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:50 PM2018-12-08T15:50:54+5:302018-12-08T15:55:08+5:30

शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांमध्ये पोटॅशियमचाही प्रामुख्याने समावेश होतो. पोटॅशियममध्ये मुबलक प्रमाणात खनिजं असून ते हृदय, किडनी, मेंदू आणि स्नायूंसाठी फायदेशीर ठरतं. हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी मदत करतं. तुमच्या दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी पोटशियमयुक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. पोटॅशियम शरीरातील फ्लूइड आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी उपयोगी ठरणारं एक आवश्यक पोषक तत्व आहे.

शरीरातील पोटॅशियमचे प्रमाण वाढविण्यासाठी रताळ्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. रताळ्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. नर्वस सिस्टिम सक्रिय ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक ठरतं. याव्यतिरिक्त रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी6 देखील असतं.

संत्र्यासारख्या आंबट फळामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असलं तरिही संत्र पोटॅशियमचा एक चांगला स्त्रोत आहे. संत्र्याचा ज्यूस व्हिटॅमिन्स, खनिजं आणि अॅन्टी-ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतो.

पालकामध्ये फार कमी प्रमाणात कॅलरी असतात. तसेच पालक प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि खनिजांचा भंडार आहे. पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या अॅन्टी-ऑक्सिडंटच्या प्रमुख स्त्रोत असतात. पालक पोषक तत्व आणि पोटॅशियमचा एक मोठा स्त्रोत आहे. यामधून इतर आवश्यक व्हिटॅमिन्स आणि खनिजं मिळण्यास मदत होते.

डाळिंबाचे दाणे आणि त्याचा ज्यूस पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. या इतर पोषक तत्वांसोबत फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतं.