स्ट्रॉबेरीचे हे ५ गुण मानवी आरोग्यासाठी असतात फार उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 03:55 PM2018-01-11T15:55:10+5:302018-01-11T17:25:11+5:30

सगळीच फळं तशी आरोग्याला हितकारक असतात. ती अख्खी किंवा ज्युसच्या स्वरुपात शरीरात जाणं आवश्यक असतं सध्या थंडीच्या मोसमात सगळीकडे स्ट्रॉबेरी भरपुर उत्पादीत झालेली दिसते. बेरी प्रकारातलं सुंदर दिसणारं हे लहानसं फळ मानवी आरोग्याला फार उपयुक्त असतं. त्यातील घटक आपली त्वचा, केस आणि सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.

१) रक्तदाब आणि ह्रदयरोग - स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्टीऑक्सिडंट्स, पॉलिफेनल्स, न्युट्रीशन्स, व्हिटामिन्स आणि मिनरल्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात. हे आपल्याला रक्तदाब आणि ह्रदयरोगापासून दुर ठेवतात. तसंच स्ट्रॉबेरीमुळे शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राहते.

२) पचनसंस्था - तसंच स्ट्रॉबेरीमध्ये अॅन्टीऑक्साईड्ससोबत असलेलं अॅसिड अन्नपचन व्यवस्थित करतात आणि रक्तात वाढणाऱ्या साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतात. तसंच टाईप - २मधील डायबेटीस असलेल्या व्यक्तीच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं.

३) कॅन्सर - स्ट्रॉबेरीमध्ये जास्त प्रमाणात व्हिटामिन सी आणि फायबर असल्याने ते कॅन्सरला दूर ठेवण्यास मदत करतं. यात असलेले गुणधर्म त्वचा, फुफ्फुसे, स्तन आणि मुत्राशयाच्या कॅन्सरला दूर ठेवतात.

४) दृष्टीविषयक - स्ट्रॉबेरीमध्ये विपुल प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट्स असतात जे दृष्टीसंदर्भातील आजारांना दूर ठेवतात. व्हिटामिन सी डोळ्यातील रेटीनामधले सेल वाढवण्यास मदत करते. तसंच त्याला कार्यरत ठेवण्यासाठी मदत करते.

५) वजन घटविणे - वजन घटवताना स्ट्रॉबेरीतील एलॅजिक अॅसिड आणि अॅन्टीऑक्सिडन्टस फार मोठी भूमिका बजावतात. हे आपल्या शरीरातील हार्मोन्स ब्लॉक करतात त्याने आपण बारीक होत जातो. शरीराचं वजन घटविण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी या लाल फळामध्ये असल्याने ते मदतीचं ठरतं.