उन्हाळ्यात कलिंगड खा आणि आजारांना दूर पळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 02:32 PM2018-05-01T14:32:59+5:302018-05-01T14:32:59+5:30

कलिंगडमध्ये व्हिटॅमिन A, C, B6 आणि खनिजं असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या ही सर्व तत्त्व मदत करतात.

जर तुम्ही वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल, तर कलिंगड नक्की खा.

रक्तातील चरबीचे (मेद) प्रमाण कमी करण्यास कलिंगड मदत करते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

कलिंगडमुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

कलिंगडमध्ये असलेल्या व्हिटॅमिन B6 मुळे बुद्धी तल्लख राखण्यास मदत होते.