रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 07:33 PM2018-12-17T19:33:12+5:302018-12-17T20:18:02+5:30

आयुर्वेदामध्ये लसणीला ‘ वंडर फूड ‘ म्हटले गेले असून, लसणीचा उपयोग औषधी म्हणून केला गेला आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारात लसणीचा समावेश करणे अगत्याचे आहे.

लसूण हृदयरोगाशी संबंधित तक्रारी दूर करण्यास मदत करते. लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते.

लसूण आणि मध मिसळून खाल्ल्यास हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होते, त्यामुळे हृदयाचा रक्तप्रवाह सुरळीत सुरु राहतो.

लसूण खाल्ल्याने उच्चरक्तदाब असल्यास तो नियंत्रित ठेवणे शक्य होते. लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

डायरिया किंवा बद्धकोष्ठ या पोटाच्या दोन्ही विकारांमध्ये लसूण उपयोगी आहे. यासाठी थोडे पाणी उकळायला ठेऊन त्यामध्ये पाच-सहा लसणीच्या पाकळ्या घालाव्यात.

पाणी साधारण सात-आठ मिनिटे उकळून घ्यावे. त्यांनतर हे पाणी थोडे कोमट झाले की प्यावे. या लसणीच्या पाण्यामुळे जुलाब आणि बद्धकोष्ठ या दोन्ही विकारांमध्ये आराम मिळतो.

लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याने जर दातदुखी सतावत असेल, तर लसणीची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. या उपायाने दात दुखी कमी होण्यास मदत होते.