सावधान! 'या' पाच गोष्टी खाणे आरोग्यासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:09 PM2019-01-12T13:09:01+5:302019-01-12T13:21:10+5:30

मशरुम : बऱ्याच जणांना मशरुम खाणं पसंत असते. मात्र मशरुम खाल्ल्यानं काहींना अ‍ॅलर्जीदेखील होते. कारण यामध्ये काही प्रमाणात विषारी पदार्थदेखील असतात. जे आरोग्यास हानिकारक आहेत.

शेंगदाणे : काही वेळेस रिकामा वेळ घालवण्यासाठी शेंगदाणे खाण्याची सवय असते. अ‍ॅलर्जी असणाऱ्या व्यक्तीने शेंगदाणेचे सेवन करू नये. शेंगदाणे खाण्यापूर्वी याची अ‍ॅलर्जी तर नाही ना याची तपासणी करुन घ्यावी. कारण शेंगदाण्यांमुळे होणाऱ्या अ‍ॅनाफिलेक्सिस अ‍ॅलर्जीमुळे श्वसन नलिकेवर परिणाम होऊन एखादी व्यक्ती बेशुद्धी होण्याची शक्यता असते.

बटाटा : बटाटे वडे, बटाट्याची भाजी जवळपास सर्वांनाच खाणे पसंत असते. मात्र बटाट्यावर असणारे कोंब आणि पानं विषारी असतात. यामुळे बटाट्याचे सेवन करू नये.

शिंपल्या (मासे) : शिंपल्यांचे सेवन केल्यानं अ‍ॅनाफिलेक्सिस अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे गळ्यामध्ये सूज येणे, चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात.

सफरचंदाची बी : सफरचंद हे फळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे फळ आहे. ज्येष्ठांना आणि गर्भवती महिलांना आवर्जून सफरचंद खाण्यास सांगितले जाते. मात्र सफरचंदाचे बी आरोग्यासाठी हानिकारक असतात. चुकून सफरचंदाच्या बीचे सेवन करू नये. कारण यामध्ये सायनाईड असते. यामुळे उलट्यांचा त्रास, चक्कर येणे आणि ब्लड प्रेशरच्या समस्या निर्माण होतात.