फॉलो करा या सोप्या टिप्स अन् व्हा दीर्घायुषी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 08:43 PM2019-02-14T20:43:19+5:302019-02-14T20:47:10+5:30

हसल्यामुळे रक्त प्रवाहाचा वेग 20 टक्क्यांनी वाढतो.

सकारात्मक विचार केल्यानं तुमचं आयुष्य वाढतं.

थकलेले असतानाही व्यायाम केल्यावर तुमच्यात जास्त ऊर्जा संचारते.

सक्रिय राहा. आळस झटकून टाका. आळसी माणसांना मृत्यू लवकर गाठतो, असं निरीक्षण अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलं आहे.

व्यायाम न केल्यानं जितके मृत्यू होतात, तितकेच मृत्यू सिगारेटमुळे होतात. त्यामुळे सिगारेटसारखी व्यसनं सोडा.

जगातील 30 टक्के व्यक्ती स्थूल आहेत. निरोगी राहण्यासाठी स्थूलत्व कमी होईल, किंबहुना ते राहणारच नाही, याची काळजी घ्या.

कोणतीही नवी भाषा शिकल्यानं, नवं वाद्य वाजवल्यानं तुमच्या डोक्याला चालना मिळते.

अभ्यास केल्यानं, वाचन केल्यानंही तणाव कमी होतो.

कॉफी प्यायल्यानं ताण कमी होतो.

रोजमेरीच्या फुलांचा सुवास घेतल्यानं तुमची स्मरणशक्ती तल्लख होते. यासोबतच तुम्ही चौकस होतात.