या '६' गोष्टी कराच जेणेकरुन पाठदुखी जाईल पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 04:31 PM2018-02-14T16:31:19+5:302018-02-14T16:43:54+5:30

आजकाल तरूणांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाठीच्या समस्या उद्भवतात. आजच्या जीवनशैलीमध्ये आठ ते नऊ तास नोकरीतच एका जागी बसून जातात. काही जण खासकरुन स्त्रिया घरी येऊन आपण घरगुती कामे करतात. पण या सर्व गोष्टी करत असताना आपण नकळत काही चूका करतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. शरीराला अनेक त्रास होतात. त्यापैकीच एक त्रास म्हणजे पाठदुखी. रोजच्या धकाधकीत तुम्हालादेखील पाठीच्या समस्या होत असतील तर या ६ गोष्टी कराच आणि फरक पाहा.

१) एका जागी खूप वेळ ताठ बसू नका - जास्त वेळ ताठ बसल्याने पाठीच्या कण्यावर जोर येऊन पाठीच्या समस्या जास्त उद्भवू शकता. सतत पाठ ताठ ठेवल्याने स्नायूंवर जोर येतो त्यामुळे हाडांची लवचिकता कमी होते.

२) वजन खूप कमी करू नका - वजन कमी असणाऱ्या व्यक्तींना पाठदुखीचा जास्त त्रास होतो. तसंच पाठीला बाक येण्याचीदेखील शक्यता असते. पाठीला बाक आल्याने चाळीशीनंतर वाकताना, चालताना व बसताना त्रास होतो.

३) खूप जास्त वजन वाढवू देऊ नका - वजनदार व्यक्तींना पाठदुखीचा त्रास हा उतार वयात होतो. खूप जास्त प्रमाणात वजन वाढल्याने पाठीच्या स्नायुजवळ काही काळानंतर दुखू लागते.

४)धुम्रपान करू नका - धुम्रपान केल्याने पाठीतील हाडांतील कॅल्शियम कमी होऊन त्यांची झीज होते. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींपेंक्षा न करणाऱ्या व्यक्तींची हाडं ही मजबूत असतात.

५) अवजड सामान जास्त उचलू नका - अवजड सामानामुळे पाठीवर सर्वात जास्त वजन येऊन पाठ दुखू लागते. तसंच वद्ध व्यक्तींनी अवजड वस्तू उचलल्यास पाठीचं हाड मोडण्याचीदेखील शक्यता असते.

६) जास्त झोपू नका - झोपेत असताना आपली उशी व पाठ यांमध्ये पोकळी निर्माण झाल्याने पाठीचे आजार उद्भवतात. तसंच जास्त झोप नेहमीच शरीरासाठी हानिकारक असल्याने झोपत असताना जर उशी घेत असाल तर तुम्ही पाठीच्या दुखणींना निमंत्रण देत आहात असं समजा.