सतत डोकेदुखी अन् वागण्या-बोलण्यात बदल जाणवतोय?... जाणून घ्या, ब्रेन ट्युमरची अशी दहा लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 04:15 PM2018-06-06T16:15:48+5:302018-06-08T15:05:46+5:30

'वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे' निमित्ताने ब्रेन ट्यूमरची लक्षणं कशी ओळखावीत याची माहिती देणार आहोत.

मेंदूच्या पुढच्या भागात गाठ आल्यानंतर लोकांच्या वागण्यात आणि बोलण्यात बदल होतो. त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. जर आपल्या वागण्यात अचानक बदल झाला तर डॉक्टरांची भेट नक्की घ्या.

मेंदूमध्ये गाठ आल्यानंतर दररोजची छोटी-छोटी कामेही करताना अडचण येते किंवा होत नसतील तर डॉक्टरांकडे जाऊन तपास करा

वारंवार फिट येत असेल तर वेळीच सावधान व्हा, कारण हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. फीट आल्यानंतर व्यक्ती बेशूद्ध पडते त्यामुळे याला स्वस्तात घेऊ नका.

जर तुम्हाला वारंवार डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कारण हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.

मेंदूच्या खालील भागामध्ये गाठ आल्यानंतर कमी ऐकू येऊ शकतो. गाढ वाढल्यानंतर हा त्रास आणखी वाढू ऐकू येणे बंद होऊ शकते. अचानक कमी ऐकू येऊ लागल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्यावी

थकवा जाणावणं आणि थोडीदेखील हालचाल केली तर कंप निर्माण होणं.

शरीरावर नियंत्रण न राहणं. शारीरिक हलचालीमध्ये थकवा जाणवत असेत तर तुम्हाला ब्रेन ट्युमर झालेला असू शकतो. मेंदूमध्ये गाठ आल्यानंतर शारीरिक हालचाली करताना थकवा जाणवतो. त्यामुवळे योग्या वेळी उपाय करावा.

डोळे दुखणे आणि जळजळणे यासारखा त्रास होत असेल तर वेळीच सावध व्हा.

अचानक बोलताना अडखळायला सुरुवात झाल्यास हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते

चक्कर येणं, उलट्या होणं, पायांमध्ये अशक्तपणा, अस्वस्थपणा जाणवत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन वेळेत उपाय करा