रेयाल माद्रिदची पर्यावरणस्नेही जर्सी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 04:07 PM2018-08-07T16:07:41+5:302018-08-07T16:11:10+5:30

स्पेनमधील रेयाल माद्रिद क्लबने मंगळवारी आपल्या तिस-या जर्सीचे अनावरण केले. गुलाबी रंगाची ही नवी जर्सी परिधान करून क्लबच्या खेळाडूंनी फोटोशूट केले. या जर्सीची खासियत म्हणजे समुद्रात टाकण्यात आलेले प्लास्टिक गोळा करून ती बनवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक स्पर्धेतील रोमाविरूद्धच्या लढतीत रेयाल माद्रिदचे खेळाडू ही जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत. पर्यावरणस्नेही भूमिका घेणारा रेयाल हा एकमेव क्लब नाही. मँचेस्टर युनायटेड, युव्हेंटस आणि बायर्न म्युनिक यांनीही टाकाऊ प्लास्टिकपासून जर्सी तयार केल्या आहेत.

एका कार्यक्रमात या जर्सीचे अनावरण झाले. त्यावेळी रेयालचे नॅचो (डावीकडून), बेंझेमा, गॅरेथ बेल आणि टोनी क्रुस हे व्यासपीठावर उपस्थित होते.

रेयालचे नवीन प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यासाठी लुकास सज्ज होत आहे.

विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालविरूद्ध गोल करणारा स्पेनचा नॅचो हाही रेयाल क्लबचा सदस्य आहे.

ब्राझिलचा प्रमुख खेळाडू मार्सेलोने नव्या जर्सील दिलेली ही पोझ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

रेयाल माद्रिदचा प्रमुख आक्रमणपटू करिम बेंझेमाने प्लास्टिकचा पुनर्वापर करून तयार केलेली जर्सी घालून पोझ दिली.