अवघा महाराष्ट्र होणार फुटबॉलमय; 'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल महोत्सवाचं झालं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:41 AM2017-09-15T10:41:59+5:302017-09-15T10:45:08+5:30

पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ,मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएकशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत.

मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली विविध ठिकाणी फुटबॉल खेळणार असून शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे 200 मैदानांची आखणी करण्यात आली आहे.

महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांनीही फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात 1कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे.