अर्जेंटिनाचा स्टार कॅप्टन मेस्सी आता बार्सिलोनाचाही कॅप्टन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:41 PM2018-08-11T16:41:17+5:302018-08-11T16:49:22+5:30

स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोनाने शुक्रवारी दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीला बार्सिलोनाचा कॅप्टन म्हणून घोषित केलं.

2015पासून आंद्रे इनिएस्टा बार्सिलोनाचा कॅप्टन होता.

काहि दिवसांपूर्वीच आंद्रे बार्सिलोना राम राम करत जापान फुटबॉल क्लब विसेल कोबेकडून घेण्यास सुरुवात केली.

आता बार्सिलोनाचा कॅप्टन म्हणून आंद्रेच्या जागी क्लबकडून मेस्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.

मेस्सीने याआधीही बऱ्याचदा आंद्रेच्या अनुपस्थितीमध्ये क्लबचं कॅप्टनपद भूषवलं आहे.

मेस्सी क्लबसाठी सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू असून आतापर्यंत त्याने या प्रसिद्ध स्पॅनिश क्लबसाठी 552 गोल केले आहेत.

मेस्सीला वयाच्या १०व्या वर्षी ‘ग्रोथ हार्मोन डिफिशिएंसी’सारख्या आजाराने ग्रासलं होतं. त्यावेळी मेस्सीच्या उपचाराचा खर्च बार्सिलोना क्लबने केला होता.