इटलीच्या बफनचे पॅरिसमध्ये जंगी स्वागत !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 09:31 PM2018-07-11T21:31:30+5:302018-07-11T21:39:38+5:30

इटलीचा दिग्गज गोलरक्षक जिजी बफन याचे पॅरिसमध्ये शाही स्वागत झाले. 40 वर्षीय बफन पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळणार आहे आणि क्लबसोबत करार करण्यासाठी तो कुटुंबासह येथे दाखल झाला. 2001 ते 2018 या कालावधीत बफनने युव्हेंट्स क्लबचे प्रतिनिधित्व केले होते.

पॅरिस सेंट-जर्मेन क्लबच्या कार्यालच्या दिशेने जात असताना गोलरक्षक बफनला आलिशान गाडीतून नेण्यात आले. त्यावेळी बफन गाडीची काच खाली करून चाहत्यांना अभिवादन करत होता.

बफनच्या गाडीसोबत मोटार सायकलींचाही ताफा होता. त्या स्कुटरवर एका बाजुला इटलीचा तर पॅरिस सेंट-जर्मेन क्लबचा ध्वज घेतला आहे.

अधिकृत घोषणेच्या वेळी बफन हात उंचावून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना.

पत्नी ईलारिया डी'अॅमिको आणि दोन मुलांसह बफन पॅरिसमध्ये दाखल झाला होता

पॅरिस सेंट-जर्मेनच्या स्टेडियमवर मालक अल-खेलैफी आणि बफन.