ख्रिस्तियानो रोनाल्डो अव्वल नंबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:34 AM2018-11-28T10:34:04+5:302018-11-28T10:42:40+5:30

चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये विजयाचे शतक साजरे करण्याचा मान ख्रिस्तियानो रोनाल्डोने पटकावला. युव्हेन्टस क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने बुधवारी व्हॅलेन्सिया क्लबविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून हे शतक साजरे केले. चॅम्पियन्स लीगमध्ये असा विक्रम नोंदवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोनाल्डो गोल्सच्या बाबतितही आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 121 गोल्स आहेत.

चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी ( बार्सिलोना) 105 गोलसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

रेयाल माद्रिद आणि स्कल्क क्लबचे प्रतिनिधित्व केलेला रॉल गोंझालेज ( 71) या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे.

करिम बेंझेमानेही चॅम्पियन्स लीगमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. लियॉन आणि रेयाल माद्रिद क्लबचे प्रतिनिधित्व करताना त्याने 59 गोल्स नावावर केले आहेत.

पीएसव्ही, मँचेस्टर युनायटेड व रेयाल माद्रिदच्या रूड व्हॅन निस्टलरूयच्या नावावर 56 गोल्स आहेत

बायर्न म्युनिचचा रॉबर्ट लेवांडोवस्कीने बुधवारी या क्लबमध्ये एन्ट्री केली. त्याच्या नावावर 51 गोल आहेत.

गोलचे अर्धशतक साजऱ्या करणाऱ्या खेळाडूंमध्ये मोनॅको, आर्सेनल व बार्सिलोना क्लबचे प्रतिनिधित्व केलेला दिग्गज खेळाडू थिएरी हेन्री सातव्या स्थानावर आहे.