19व्या वर्षी 'बापमाणूस' बनलेला तो आज आहे जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:00 PM2019-02-07T15:00:39+5:302019-02-07T15:09:18+5:30

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू... पण, या दोघांनाही तोडीसतोड उत्तर देण्याची धमक ब्राझिलच्या नेयमारमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी नेयमारने 27वा वाढदिवस साजरा केला. त्याच्याबद्दल माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी आज जाणून घेऊया...

नेयमार याचा जन्म ब्राझिल येथील साऊ पोऊलो इथला... वयाच्या 11व्या वर्षी त्याला ब्राझिलमधील प्रसिद्ध क्लब सँतोस एफसीने खेळण्याचा प्रस्ताव दिला.

नेयमारचे वडील नेयमार सँतोस सीनियर हेही माजी फुटबॉलपटू होते आणि सध्या ते नेयमारचे सल्लागार आहेत

प्रसिद्ध टाईम्स मॅगझीनमध्ये समाविष्ट करण्यात आलेला तो ब्राझिलचा एकमेव खेळाडू आहे

नेयमार वयाच्या 19व्या वर्षी बाप झाला... डॅव्ही ल्युका असे त्याच्या मुलाचे नाव आहे, परंतु त्याने त्या मुलाच्या आईचे नाव जाहीर केलेले नाही.

वयाच्या 14व्या वर्षी तो रेयाल माद्रिद क्लबकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पेनमध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याला महिन्याला 1 लाख 95 हजार रुपये मिळत होते. आज तो जगातील सर्वात श्रीमंत खेळांडूपैकी एक आहे.

20 व्या वर्षी त्याने शंभरावा व्यावसायिक गोल केला. नेयमार सध्या पॅरिस सेंट-जर्मेन क्लबकडून खेळतो.