ड्रिंक्सची चव वाढवण्यासाठी फ्लेव्हर्स वापरता? तुमचं ड्रिंक विषारी करताहेत हे पदार्थ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 12:47 PM2019-05-28T12:47:56+5:302019-05-28T12:53:37+5:30

कॉफी असो वा ज्यूस यांना वेगळी टेस्ट देण्यासाठी लोक यात काहीना काही मिश्रित करत असतात. याने ज्यूस किंवा कॉफीची चव तर बदलते, पण याने आपलं आरोग्य मात्र अडचणीत येतं. चला जाणून घेऊ अशाच काही पदार्थांबाबत ज्यांच्यामुळे वेगवेगळे पेय हानिकारक होतात.

१) अ‍ॅपल व्हिनेगर - आजकाल लोक याचा वापर त्यांच्या ड्रिंक्समध्ये अधिक करत आहेत. पण याचं अधिक प्रमाण तुमच्या पचनक्रियेला खराब करतं. त्यामुळे तुमची ब्लड शुगर लेव्हल अनियमित होऊ शकते.

२) Non-dairy Creamer - याचा वापर अधिक प्रमाणात कॉफीमध्ये केला जातो. याने तुम्हाला अधिक कॅलरी मिळतात. याचं सेवन केल्याने तुम्हाला अधिक प्रमाणात शुगर मिळते. पण हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

३) Essential Oils - अलिकडे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. पण अनेकदा हे तेल पचायला जड असतात. त्यामुळे पोटाची समस्या सुरू होते. एका रिसर्चनुसार, पुदीन्याचं दुसरं रूप Pennyroyal आपल्या लिव्हरसाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे याचा वापर कमीच केला पाहिजे.

४) बटर आणि तेल - काही लोक कॉफीमध्ये बटर टाकून पितात. याने आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होऊ शकता.

५) Tapioca Pearls - याचा वापर नेहमी Bubble Tea तयार करण्यासाठी केला जातो. हे कार्ब्स म्हणजेच कार्बोहायड्रेटचं छोटं स्वरूप असतात. पण हे आर्टिफिशिअल असतं. त्यामुळे हे खाल्ल्याने आरोग्य बिघडतं.

६) Energy Drinks - आजकाल लोक थकवा घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स अल्कोहोलमध्ये टाकून सेवन करतात. याने त्यांना काही वेळासाठी दिलासा मिळत असेल, पण नंतर हे फार महागात पडू शकतं. याने तुम्हाला अल्कोहोलची सवय लागू शकते आणि तुमचा रागही याने वाढू शकतो.

७) Flavor Shots आणि Syrups - काही लोक कॉफीला शुगर फ्री करण्यासाठी त्यात अनेकप्रकारचे Flavor Shots आणि Syrups मिश्रित करतात. म्हणजे हे नकळत अधिक प्रमाणात कॅलरी घेण्यासारखं आहे. एका रिसर्चनुसार, याचं अधिक सेवन केल्याने भूक वाढते, म्हणजे तुम्ही अधिक प्रमाणात कॅलरी घेण्याकडे वळताहात.

८) Artificial Sweeteners - याचाही वापर वेगाने वाढत आहे. एका रिसर्चनुसार, अधिक प्रमाणात Artificial Sweeteners सेवन केल्याने व्यक्तीचं वजन वाढतं आणि त्याच्या हृदयाच्या क्रियेवरही नकारात्मक प्रभाव पडतो.

८) लिंबू - Corona ही बीअर लिंबूसोबत घेतली जाते. पण हे लिंबू कधी कधी त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण आहे सूर्यातून निघणारे अल्ट्रावॉयलेट किरणं, जे याला विषारी करतात. अनेकदा लिंबूसोबत अनेकप्रकारचे बॅक्टेरिया शरीरात जातात. त्यानेही त्वचेचं नुकसान होतं.

९) Carbonation - Carbonated ड्रिंक्स तुमचं वजन वाढण्याला कारणीभूत ठरतात आणि याने दातही खराब होतात. त्यासोबतच हे पोटासाठीही चांगलं नसतं. त्यामुळे हे ड्रिंक्स न घेतलेले बरे.