'या' आहेत जगातील सर्वात महागड्या आइस्क्रिम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 05:26 PM2018-07-17T17:26:11+5:302018-07-17T17:33:51+5:30

जेवणानंतर सर्वांचे आवडते डेझर्ट म्हणजे आइस्क्रिम. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण आइस्क्रिमचे शौकीन असतात. काहीतरी थंड खाण्याचा मूड झाल्यानंतर सर्वात पहिला प्रेफरन्स हा आइस्क्रिमलाच असतो. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आणि किंमतीच्या आइस्क्रिम उपलब्ध आहेत. पण जगातल्या सर्वात महागड्या आइस्क्रिम्सची किंमती ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

स्ट्रॉबेरी एट अरनोड्स - या आइस्क्रीमची किंमत ३९ लाख डॉलर इतकी आहे. यामध्ये तुम्हाला आइस्क्रीमसोबतच 7.09 कॅरेटची पिंक डायमंन्ड एन्गेजमेंट रिंगही मिळते. या फ्रेन्च व्हेनिला आइस्क्रीममध्ये स्ट्रॉबेरी आणि मिंटची क्रिम असते. यासोबत 25,000 डॉलर किंमतीची वाइनही मिळते.

एबसरडिटी संडे - या आइस्क्रीमसोबतच तुम्हाला तंजानिया फिरण्याचे एक लग्जरी टूर तिकीटही मिळते. राहण्याची व्यवस्थाही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात येते. याची किंमत 60,000 डॉलर इतकी आहे.

फ्रोजन हॉट चॉकलेट - या आइस्क्रीमची जगातील सर्वात महागडी आइस्क्रीम म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. याची किंमत 25,000 डॉलर आहे. ही आइस्क्रीम 28 कोकोपासून तयार करण्यात येत असून त्यातील 14 कोको जास्त महागडे आहेत. सोन्याच्या वाटीमध्ये खाण्यासाठी देण्यात येते. या वाटीचा बेस सफेद हिऱ्याने तयार करण्यात आलेला असतो.

गोल्डन ओपुलेंस संडे - ही आइस्क्रीम चॉकलेट आणि व्हेनिलाच्या बियांचे कॉम्बिनेशन करून तयार केली जाते. यावर सोन्याचा मुलामा चढवलेल्या साखरेची पाने लावण्यात येतात. त्याचसोबत यामध्ये बदामाचाही वापर करण्यात येतो. ही आइस्क्रीम खरेदी करण्यासाठी 48 तास आधी ऑर्डर देणे गरजेचे असते. हिची किंमत 1,000 डॉलर आहे.

द व्हिक्टोरिया - क्रिस्टलच्या वाटीमधून देण्यात येणाऱ्या या आइस्क्रीमची वाटी खाणारा घरीही घेऊन जाऊ शकतो. ही तयार करण्यासाठी चॉकलेट आणि व्हेनिलाचा वापर करण्यात येतो. या आइस्क्रीमची किंमत 1,000 डॉलर असून हिला गोल्डन कैरेमलाइज्ड आणि सोन्याच्या पानांनी सजवले जाते. याचसोबत यामध्ये २४ कॅरेट गोल्ड डस्टचाही वापर करण्यात येतो.