मधात भेसळ तर नाही ना? हे ओळखण्यासाठी वापरा 'या' टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 05:11 PM2019-06-20T17:11:26+5:302019-08-05T19:04:56+5:30

शरीराचं सौंदर्य आणि आरोग्य राखण्यासाठी आपण मधाचा वापर करत असतो. परंतु, सध्या बाजारात मिळणाऱ्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवणं अशक्यचं. दररोज आपल्या ऐकण्यातही खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीबाबत अनेक गोष्टी येत असतात. मधामध्येही अनेकदा भेसळ होत असते. अशातच हे जाणून घेणं आवश्यक आहे की, तुम्ही वापरत असलेलं मध शुद्ध आहे की नाही. जाणून घेऊया मध शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी काही पद्धती...

मधाची शुद्धता तपासण्यासाठी पाण्यासोबत त्याची टेस्ट करा. यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये मधाचे काही थेंब एकत्र करा. जर ते पाण्यामध्ये विरघळू लागले तर याचा अर्थ आहे की, मध शुद्ध नसून भेसळयुक्त आहे. कारण शुद्ध मध ग्लासमध्ये टाकल्यानंतर ग्लासच्या तळाशी जाऊन बसतं.

नैसर्गिक आणि शुद्ध मध चवीसाठी गोड, नरम आणि सुगंधित असतं. तसेच भेसळयुक्त मध खाल्यानंतर घशामध्ये थोडीशी जळजळ आणि खवखव होते.

थम टेस्ट करून तुम्ही मध शुद्ध आहे की नाही हे ओळखू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या अंगठ्यावर मधाचा एक थेंब घ्यावा लागेल. जर हा थेंब तुमच्या अंगठ्यावर पसरला किंवा अंगठा खालच्या बाजूस केल्यानंतर खाली पडला तर मधा भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट होतं.

तुम्ही कदाचितच माहित असेल की, मध ज्वलनशील असतं. जर एखाद्या लाकडाच्या वस्तूवर मध पडलेलं असेल आणि जर त्याला आग लावली तर ते लाकूड जळण्यासाठी मध मदत करतं. त्यामुळे पूजेमध्ये हवन करताना मधाचा वापर केला जातो. म्हणून मधाची फ्लेम टेस्ट करण्यासाठी माचिसची एक काडी घ्या. त्याच्या विरूद्ध बाजूला मध लावा आणि त्यानंतर माचिसची काडी पेटवा. जर मध शुद्ध असेल तर काडी सहज जळण्यास मदत होईल.

मध शुद्ध आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्ही व्हिनेगरची मदत घेऊ शकता. त्यासाठी एक चमचा मधामध्ये थोडसं पाणी आणि काही थेंब व्हिनेगर एकत्र करा. जर मधाच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये बदल घडून आला तर मध घट्ट होतं. यातून सिद्ध होतं की, मध भेसळयुक्त आहे.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.