पावसाळ्यात मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 06:36 PM2019-07-21T18:36:02+5:302019-07-21T19:05:55+5:30

पावसाळ्यात लहान मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. मुलं आजारी पडण्याची शक्यता ही अधिक असते. मुलांच्या हेल्दी डाएटमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे जाणून घेऊया.

मसाला चहा हे लहान मुलांसाठी ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण मसाला चहा ही आरोग्यासाठी उत्तम असते. लहान मुलं पावसात भिजल्यानंतर त्यांना मसाला चहा द्या. मसाला चहामध्ये असलेल्या मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडेंट्समुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

लहान मुलांच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश करा. फळांमध्ये पोषक घटक असल्याने मुलांना ती आवर्जून द्या.

नारळ पाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढते तसेच आजारांना लांब ठेवण्यास मदत होते.

दह्यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आढळून येतं. दूधाच्या तुलनेत दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दह्यामध्ये दूधाच्या तुलनेत जास्त प्रमाणात कॅल्शिअम असतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.