सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं केशर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 05:48 PM2018-11-12T17:48:59+5:302018-11-12T17:52:32+5:30

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी त्याचप्रमाणे सतेज करण्यासाठी केशराचा वापर करण्यात येतो.त्याचप्रमाणे गरोदर महिलांना बाळाची त्वचा चांगली व्हावी म्हणून दूधातीन केशर दिलं जातं. केशराच्या अनेक सौंदर्यवर्धक फायद्यांसोबतच आरोग्यदायी फायदेही आहेत. जाणून घेऊयात आरोग्यदायी फायद्यांबाबत...

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांचा रॅटीना खराब होण्याचा धोका असतो. केशरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. तसेच डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठीही केशर उपयोगी ठरते.

ट्यूमरपासून सुटका करण्यासाठीही केशर फायदेशीर ठरते. केशराचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. किमोथेरपीमुळे होणारे साइड इफेक्ट्स म्हणजे वजन कमी होणं, हिमोग्लोबिनची पातळी कमी जास्त होणं यावर उपाय म्हणून केशरचा फायदा होतो. केशराचे नियमित सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन ए चे प्रमाण वाढतं.

स्मरणशक्तीवरही केशर फायदेशीर ठरतं. अल्झायमरसारख्या आजार दूर ठेवण्यासाठी केशर हा नैसर्गिक उपाय आहे.

केशर रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते.

एक ग्लास पाण्यामध्ये मध आणि केशर एकत्र करून प्यायल्याने पोटाच्या तक्रारींपासून सुटका होते.