... म्हणून अवोकाडोचा आहारात समावेश करणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:59 AM2019-03-25T09:59:29+5:302019-03-25T10:06:09+5:30

आपल्याला अनेकदा डॉक्टर आहारामध्ये फळांचा समावेश करण्याचा सल्ला देत असतात. फळांचे आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. अशातच गेल्या काही दिवसांपासून एक फळ फार चर्चेत आहे. ते म्हणजे, अवोकाडो. हे फळं आपल्या वेगळ्या चवीसाठी ओळखलं जातं. त्याशिवाय अनेक पदार्थ तयार करण्यासाठीही या पदार्थाचा वापर करण्यात येतो. अवोकाडोला बटर फ्रूट म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये हेल्दी मोनोसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळून येतं. जाणून घेऊया या फळाचे काही फायदे...

अवोकाडोमध्ये बीटा-सिटोस्टेरॉल आढळून येतं. जे कोलेस्ट्रॉल लेव्हल मॅनेज करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

फॉलेट रिच फूडमुळे पोट, सर्वाइकल, पॅक्रियाटिक कॅन्सरचा धोका कमी होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, फॉलेट डीएनएचं म्यूटेशन रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं. (Image Credit : medicaldaily.com)

अवोकाडोमध्ये व्हिटॅमिन K आढळून येतं. फक्त अर्ध्या अवोकाडोमुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या गरजेचे 25 टक्के व्हिटॅमिन मिळण्यास मदत होते. (Image Credit : Lifetime Daily)

अवोकाडोमध्ये अनेक अशी तत्व आढळून येतात जी डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर अल्ट्रावॉयलट किरणांपासूनही डोळ्यांचं रक्षण करतात. (Image Credit : Thrillist)

अवोकाडो वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये अवोकाडोचा समावे करणं फायदेशीर ठरतं. (Image Credit : Phen375)

अवोकाडोमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट आढळून येतात. हे आपल्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासोबतच त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठीही मदत करतात. (Image Credit : self.com)