नागपुरात असाल, तर 'या' पदार्थांची चव नक्की चाखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:40 PM2019-07-17T13:40:40+5:302019-07-17T13:43:23+5:30

तर्री पोहा: तर्री पोहा खाल्ल्याशिवाय नागपूर भेट पूर्णच होऊ शकत नाही. नागपुरात अनेक ठिकाणी तुम्हाला तर्री पोह्याची चव चाखता येईल.

चाट- नागपुरात अनेक ठिकाणी चाटवर आडवा हात मारला येईल. पाणीपुरी, शेवपुरी आणि पावभाजी असे अनेक पदार्थ नागपुरातील रस्त्यावर मिळतात.

सामोसा- सामोसा आणि चहाचा आस्वाद तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी घेता येईल.

पतोडी- नागपूरची पतोडी भाजी अतिशय प्रसिद्ध आहे. बेसनपासून तयार करण्यात आलेली पतोडी आणि सोबत विविध मसाल्यांपासून तयार करण्यात आलेली तर्री यांची चव एकदा तरी चाखायलाच हवी.

जिलेबी- तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील, तर जिलेबीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. मोठमोठ्या कढयांमध्ये तळण्यात येणारी जिलेबी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

मिसळ पाव- संपूर्ण राज्यात मिसळ पाव अगदी चवीनं खाल्ला जातो. नागपूरदेखील याला अपवाद नाही. तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी लज्जतदार मिसळ पावची चाव चाखता येईल.

टॅग्स :अन्नfood