पावसाळ्यात फळं खाण्याआधी करा 'ही' काम; आजार राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 01:48 PM2019-06-17T13:48:53+5:302019-06-17T13:54:08+5:30

पावसाळ्यात पावसासोबतच अनेक इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाचंही आगमन होतं. जर योग्य आणि संतुलित आहार गरजेचा असतो. अन्यथा वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर पावसाळ्यामध्येही फळं खाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं आश्यक असतं.

अनेकदा आपण साल असलेली फळं न धुताच त्यांची साल काढून खाऊन टाकतो. तुम्हीही असं करत अशाल तर असं करणं वेळीच थांबवा. फळं आधी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतरच त्यांची साल काढून त्यांचं सेवन करा.

पावसाळ्यात वातवरणामध्येही ओलावा असतो. अशा वातावरणात या फळांमध्ये शरीराला घातक असे बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या फळांपासून दूर रहा.

पावसाळ्यामध्ये सीझनल फळांवर किडे पडण्याची शक्यता असते. खासकरून त्या फळांमध्ये जे या सीझनमधील नसतात. त्यामुळे फळांचं सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

पावसाळ्यामध्ये कापलेली फळं किंवा खराब झालेल्या फळांचं सेवन करू नका. अशा फळांमध्येही हानिकारक बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजारातून नेहमी स्वच्छ फळं खरेदी करा.

बराच वेळ कापलेल्या फळांचं सेवन करू नका. फळं कापून ती फ्रिज्डमध्ये ठेवा. जर बराच वेळ फ्रिजमध्ये फळं कापून ठेवत असाल तर अशा फळांचं सेवन करू नका.

जास्तीत जास्त लोक घरामध्ये ज्यूस तयार करून पितात. त्यासाठी लोक रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्टॉल्सवरही ज्यूस पितात. पावसाळ्यामध्ये असं अजिबात करू नका. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.