तुम्ही वजन कमी करताय? पापड खाणे करा बंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 02:56 PM2019-02-13T14:56:53+5:302019-02-13T15:05:23+5:30

आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या टेस्टचे आणि रंगांचे पापड-चिप्स सहज मिळतात. अनेकांना जेवताना तळलेला किंवा भाजलेला पापड खाणे पसंत असतं. इतकच नाही तर कॉकटेल स्नॅक्स म्हणूनही अलिकडे पापड दिला जातो. मात्र जिभेचे चोचले पुरवणारा पापड तुमच्या आरोग्यासाठी किती हानिकारक असतो हे तुम्हाला माहीत आहे का?

पापड तयार करणाऱ्या अनेक फॅक्टरीजमध्ये स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते हे आपल्याला माहीत नसतं. हे पापड वाळवण्यासाठी उन्हात मोकळ्या जागेत ठेवले जातात. त्यावर धूळ-माती जमा होते.

तळलेल्या पापडांमध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक प्रमाणात असतात. एका शोधानुसार, तळलेल्या आणि मंद आचेवर भाजलेल्या पापडामध्ये एक्रिलामाइड हे टॉक्सिन अधिक प्रमाणात असतं. याने अस्वस्थपणा, घाबरणे आणि मूड स्विंग अशा समस्या होत असतात.

दुकानातून खरेदी केलेल्या पापडांमध्ये नेहमी आर्टिफिशिअल फ्लेवर आणि मसाले टाकलेले आढळतात. या फ्लेवर आणि मसाल्यांमुळे पोटाची समस्या होऊ शकते. जास्त पापड खाल्ल्याने अपचनाची समस्या होऊ शकते. (Image Credit : NBT)

दोन पापड हे एका चपातीच्या बरोबरीत असतात. तसेच यात कॅलरीही भरपूर असतात. त्यामुळे तुम्हाला कॅलरी कमी करायच्या असतील तर पापड खाऊ नका.

तसेच फार जास्त काळासाठी पापड ताजे रहावे म्हणून पापड तयार करणाऱ्या कंपनी यात प्रिजरवेटीव्ह टाकतात. सोबतच यात मिठासोबत सोडियम सॉल्टही टाकतात. याने पापडाची चव वाढते. जास्त मीठ हे हार्ट आणि किडनीसाठी चांगलं नसतं. (Image Credit : ratlamee.com)