लठ्ठपणा आणि डायबिटीजपासून मुलांना वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ दूर ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:07 PM2019-03-18T18:07:50+5:302019-03-18T18:14:38+5:30

सध्या देशाभरामध्ये डायबिटीजच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या आजाराची लक्षणं फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही दिसून येत आहेत. डायबिटीज होण्यामागे अनेक कारणं असतात पण त्यातल्यात्यात योग्य आहारामुळे तुम्ही यापासून बचाव करू शकता. पालक आपल्या मुलांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल करून त्यांना डायबिटीजपासून दूर ठेवू शकतात. जाणून घेऊया खाण्याच्या त्या पदार्थांबाबत ज्यांना मुलांपासून दूर ठेवून डायबिटीजपासून बचाव करू शकता.

जास्तीत जास्त घरांमध्ये व्हाइट ब्रेडचा वापर करण्यात येतो. परंतु, कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, व्हाइट ब्रेडच्या अधिक सेवनाने डायबिटीज होण्याचा धोका अधिक वाढतो. दरम्यान, व्हाइट ब्रेड शरीरामध्ये गेल्यानंतर ब्रेक झाल्यानंतर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतो. त्यांनंतर त्याचं शुगरमध्ये रूपांतर होते.

जंक फूडमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरी आणि कोलेस्ट्रॉल असतं. जे आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं. याच्या सेवनाने शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरी जमा होतात. या सर्व कॅलरी पचवणं शक्य होत नाही. परिणामी मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढते. कारण डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर यांसारख्या आजारांचं मूळ आहे.

आपल्या मुलांना नेहमी कमी कोलेस्ट्रॉल असलेलं, परंतु पोषक तत्व मुबलक प्रमाणात असलेले खाद्यपदार्थ खाण्यासाठी द्या. त्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळणं सहज शक्य होईल. जेवणामध्ये फळं, भाज्या, दूध, सलाड, लीन प्रोटीन यांसारखे पदार्थ खाण्यासाठी द्या. हाय फॅट असणाऱ्या पदार्थांपासून मुलांना दूर ठेवा.

मुलं जर जास्त चॉकलेट्स आणि कॅन्डिज खात असतील तर त्यांना असं करू देऊ नका. कारण चॉकलेट आणि कॅन्डिजचं अतिसेवन डायबिटीजसाठी कारण ठरू शकतं. (टिप : कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन शरीरासाठी हानिकारक ठरतं. सांगण्यात आलेल्या सर्व पदार्थांव्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ डायबिटीज होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे आम्ही याबाबत कोणताही दावा करत नाही. त्याऐवजी डॉक्टरांकडून सल्ला घेणं फायदेशीर ठरतं)

जास्तीत जास्त मुलांना स्वीट बेवरेज म्हणजेच गोड पेय पदार्थ पिण्याचा शौक असतो. जसं की, कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा आइस-टी इत्यादी. जेवढं तुम्ही मुलांना या पदार्थांपासून दूर ठेवणार, तेवढचं डायबिटीजपासून ते दूर राहतील. याच पदार्थांमुळे शरीरामध्ये शुगर लव्हल वाढते. परिणामी लठ्ठपणा वाढतो. (Image Credit : FirstCry Parenting)