'हे' ६ पदार्थ पुन्हा गरम करून खात असाल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:39 PM2019-07-23T14:39:34+5:302019-07-23T14:48:46+5:30

जेवणातील काही उरलं तर अनेकजण ते उरलेले पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर पुन्हा गरम करून खातात. अन्न फेकणं चांगलं नाही असा विचार करून अनेकजण शिल्लक राहिलेलं पुन्हा गरम करून खातात. पण असे काही पदार्थ असतात जे पुन्हा गरम करून खाल्ल्यास तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. (Image Credit : The Irish Times)

पालक - पालकभाजीचे आरोग्याला किती फायदे होतात, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. पालक भाजीमध्ये नायट्रेटचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे पालक पुन्हा गरम केली तर नायट्रेट कार्सिनोजेनिकमध्ये रुपांतरित होतं. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्स निर्माण होतात.

मशरूम - मशरूम अनेकजण आवडीने खातात. यात प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. मशरूम पुन्हा गरम केले तर यातील प्रोटीनचं कंपोजिशन बदलतं, ज्यामुळे इनडायजेशन आणि हार्टसंबंधी समस्या होऊ शकतात. (Image Credit : www.dinneratthezoo.com)

बटाटे - बटाटे शिजवल्यावर यात बोटूलिज्म बॅक्टेरिया तयार होऊ लागतात आणि पुन्हा गरम खाल्ल्यावर बॅक्टेरियाची संख्या वाढू लागते. ज्यामुळे तुम्हाला फूड पॉयजनिंग होण्याचा धोका असतो. म्हणून बटाट्याची भाजी पुन्हा गरम करून खाऊ नका. (Image Credit : www.lovefood.com)

चहा - अनेकजण एकदा चहा करून ठेवतात आणि पुन्हा पुन्हा गरम करून पितात. चहामध्ये टॅनिक अॅसिड असतं. चहा पुन्हा गरम केला तर टॅनिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे लिव्हरला समस्या होऊ शकते. (Image Credit : Foodviva.com)

कुकिंग ऑइल - कुकिंग ऑइलमध्ये एल्डिहाइड्स असतात आणि हे पुन्हा गरम केल्याने ऑइलमध्ये टॉक्सिन्स तयार होतात. जे पुढे जाऊन कॅन्सरचं कारण ठरू शकतात.

भात - भात पुन्हा गरम केल्याने बेसिलस सेरियस बॅक्टेरिया तयार होतात आणि पुन्हा गरम केल्याने या बॅक्टेरियांची संख्या दुप्पट होते. याने डायरिया होण्याचा धोका अधिक राहतो.(Image Credit : themom100.com)