'या' गोष्टींशिवाय अपूर्ण वाटेल तुमचा साडीवरील साज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:20 PM2018-12-18T18:20:39+5:302018-12-18T18:26:09+5:30

साडी म्हणजे भारताची संस्कृतीच नव्हे तर भारतातील पारंपारिक पोशाख आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. अनेक सेलिब्रिटींचीही पहिली पसंती साडीला असते. कोणत्याही समारंभासाठी साडी हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो. साडीसोबत एक्सपरिमेंट करून तुम्ही पारंपारिक लूकसोबतच फॅन्सी लूकही ट्राय करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का? साडीसोबतच काही एक्सेसरीजही तुमचा लूक परिपूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. या एक्सेसरिजशिवाय तुमचा लूक अपूर्ण वाटतो. जाणून घेऊया साडी परिधान केल्यानंतर एक परफेक्ट लूक मिळवण्यासाठी कोणत्या एक्सेसरिज महत्त्वाच्या ठरतात त्याबाबत..

तुम्ही साडीला थोडा हटके लूक देण्यासाठी साडीसोबत हेव्ही ब्लाउज वेअर करू शकता. तसेच ब्लाउजच्या बॅक नेक वेगळ्या स्टाइलमध्ये केला असेल तर केसांचा आंबाडा म्हणजेच जुडा बांधा. तुम्ही मेसी जुडाही ट्राय करू शकता. अशातच केसांमध्ये गजरा माळला तर तुमचा लूक कम्पलिट होण्यास मदत होईल.

साडी आणि नाकामध्ये नथीचा तोडा एक हटके कॉम्बिनेशन. साडी आणि त्यावर महाराष्ट्रीयन नथ परिधान केल्यामुळे क्लासी लूक मिळण्यास मदत होईल. पण तेच जर तम्ही नाकामध्ये नथ घालण्याऐवजी नोज पिन ट्राय केली तर तुम्हाला ट्रेन्डी लूक मिळेल.

बहुतेकवेळा साडीवर पारंपारिक दागिने घालण्यात येतात. जर तुम्ही साडीवर कोणते दागिने परिधान करावे याबाबत विचार करत असाल तर तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटी दीपिका पादुकोण किंवा कृती सेननकडून टिप्स घेऊ शकता. साडीसोबत मोठे स्टड्स आणि लांब झुमके सुंदर दिसतात.

सध्या चोकर नेकपीस ट्रेन्डमध्ये आहे. तुम्ही साडीवर दीपिकाप्रमाणे चोकर नेकपीस वेअर करू शकता किंवा शिल्पा शेट्टीप्रमाणे सिम्पल साडीवर स्टायलिश नेकपीस ट्राय करू शकता.

साडी नेसणार असाल तर हात मोकळे ठेवून चालणार नाही. तुम्हाला एक परिपूर्ण लूक करायचा असेल तर शिल्पा शेट्टीप्रमाणे गोल्डन ब्रेसलेट वापरू शकता. तसेच विद्या बालनप्रमाणे सोन्याचं मोठं कडं ट्राय करू शकता. दोन्हीही ऑप्शन साडीवर क्लासी लूक मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील.