इतरांपेक्षा वेगळं क्लासी आणि कूल दिसायचं असेल तर; 'या' 12 पद्धतीने वेअर करा White Shirt

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 06:02 PM2019-05-09T18:02:31+5:302019-05-09T18:11:14+5:30

पांढरा रंग शांति आणि शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. तसेच उन्हाळा आला की, अनेक जण पांढऱ्या आउटफिट्सना पसंती देतात. अशातच बाजारतही पांढऱ्या आउटफिट्सची मागणीदेखील वाढत आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये कंम्फर्टेबल असण्यासोबतच कूल लूक मिळण्यासही मदत होते. आज आम्ही सांगणार आहोत White Shirt मधील क्लासी लूक्सबाबत... उन्हाळ्यामध्ये तुम्हीही हे लूक्स फॉलो करू शकता. आज जाणून घेऊया White Shirt Carry करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही क्लसी लूक्सबाबत... तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर इतर सर्व तुम्हाला फॉलो करतील...

ऑफिससाठी पांढरा शर्ट ब्लू जीन्ससोबत वेअर केल्यामुळे पूर्ण दिवस कूल लूक कॅरी करू शकता.

जर मित्रमंडळींना भेटण्याचा प्लॅन असेल तर Black Jeans किंवा Leggings सोबत हे शर्ट हटके लूक देतो.

एअरपोर्ट लूकसाठी पांढरे शूज, ब्लू डेनिम आणि व्हाइट शर्ट परफेक्ट Combination आहे.

Semi Formal आउटफिट्ससाठी ब्लॅक पॅन्टसोबत वेअर करा.

फक्त उन्हाळा नाही, तर थंडीमध्येही Formal Outfit साठी तुम्ही White Shirt ब्लू डेनिमसोबत वेअर करू शकता आणि त्यावर Cardigan वेअर करा.

जर कोणत्याही क्लबमध्ये सर्वांपेक्षा वेगळं आणि ट्रेन्डी दिसायचं आहे, तर ब्लू डेनिम स्कर्टसोबत White Shirt वेअर करा. सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील.

सर्वांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर व्हाइट अॅन्ड ब्लॅक कॉम्बिनेशनला तोड नाही.

मीटिंगमध्ये बॉसी लूक कॅरी करण्याची इच्छा असेल तर व्हाइट शर्टला High-Waist Pants सोबत वेअर करू शकता.

धावपळीमध्ये ऑफिस जावं लागत आहे आणि समजत नाही काय वेअर करू, तर शर्ट जीन्स किंवा पॅन्टसोबत Tuck करा.

प्रोफेशनल दिसायचं असेल तर हे Try करा.

जेव्हा कोणतीही महिला पांढऱ्या रंगाच्या शर्टला असं वेअर करते, तर ती आणखी कणखर आणि स्वतंत्र दिसते.

आउटिंगसाठी Shorts अगदी कंम्फर्टेबल ठरते. अशावेळी तुम्ही पांढरा शर्ट इन करून वेअर करू शकताय.