सिलेब्रिटींची ट्युनिंग न्यारी; ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसतात भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:09 PM2018-11-28T13:09:55+5:302018-11-28T13:17:40+5:30

काही दिवसांपूर्वीचं लग्नाच्या बंधनात अडकलेलं नवं जोडपं म्हणजे रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण. सध्या सर्वत्र त्यांच्या आउटफिट्सच्या चर्चा होताना दिसत आहेत. मग गोष्ट त्यांच्या ग्रँड रॉयल वेडिंगची असो, किंवा त्यांच्या ट्विनिंग आउटफिट कॉम्बिनेशनची. चाहत्यांच्या नजरा त्यांच्यावरून हटतच नाही. लग्नाच्या आधी अनेकदा आणि लग्नानंतर प्रत्येकवेळी हे कपल मॅचिंग आउटफिटमध्ये दिसून आलं आहे. पण या दोघांव्यतिरिक्त अनेक सेलिब्रिटी कपल्स आहेत जे नेहमी ट्विनिंग फॅशन ट्रेन्ड फॉले करताना दिसून येतात.

विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी बच्चन कुटुबियांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन अनेकदा ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून येतात. तसेच यांच्या ट्यूनिंगची चाहत्यांमध्ये नेहमी चर्चा असते.

क्रिकेट कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील वर्षीच लग्नाच्या बंधनात अडकले. नेहमी एकमेकांसोबत दिसून येणारं हे कपल सेम आउटफिट्समध्ये दिसून येतं.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि हॉलिवुडमधील फेमस सिंगर निक जोनस लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. हे कपलही अनेकदा सेम कलरच्या आउटफिट्समध्ये दिसून येतं. अनेकदा त्यांना एकत्र सायकलिंग करताना किंवा एअरपोर्टवर पाहण्यात आले आहे.

मीरा राजपूत बॉलिवुड सेलिब्रिटी नाही परंतु आपल्या सौंदर्याने ती अनेकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ती आणि पति शाहीद कपूर अनेकदा आपल्या रोमॅन्टीक अंदाजासोबतच सेम आउटफिट्समध्ये दिसून आले आहेत.

तसं पाहायला गेल तर टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांनी आपल्या नात्याबद्दल कोणत्याही प्रकारचं स्पष्टिकरण दिलेलं नाही. परंतु दोघेही नेहमी एकत्र ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून येतात.

बॉलिवूडमधील हे हॉट कपल नेहमी आपल्या हटके अंदाजात दिसून येतं. बिपाशा आणि करण अनेकदा एकत्र ट्विनिंग आउटफिट्समध्ये दिसून आले आहेत.

सर्वांच लाडकं कपल आणि टेलिव्हिज विश्वातील मोस्ट फेवरेट कपल म्हणजे प्रिन्स आणि युविका. काही दिवसांपूर्वीच हे कपल लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. हे दोघेही अनेकदा सेम आउटफिट्समध्ये दिसून येतात.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कपल दिव्यांका आणि विवेक यांनी आपली लग्नगाठ बांधली. वेस्टर्न आउटफिट असो किंवा ट्रेडिशनल आउटफिट. हे दोघेही सेम कलरच्या आउटफिट्समध्ये दिसून येतात.