बाथटबमधल्या फोटोनंतर करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 02:59 PM2019-01-17T14:59:54+5:302019-01-17T15:04:27+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्नाने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाथटबमध्ये केलेल्या फोटोशूटचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

करिश्माच्या या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतरच अवघ्या 15 तासांमध्ये आपले इतर हॉट फोटो शेअर केले आहेत.

करिश्माच्या या फोटोवर आतापर्यंत 50 हजारांपेक्षाही जास्त लाइक्स आले असून चाहत्यांनी कमेंट्समध्येही तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.

काही दिवसांपूर्वीच करिश्मा 'संजू' या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटामध्ये करिश्मासोबत रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, विक्की कौशल आणि दीया मिर्झा लीड रोलमध्ये होते.

करिश्मा नेहमीच आपल्या फिटनेसची आणि फिगरची काळजी घेत असते.

करिश्मा ने आपल्या करियरची सुरुवात टीव्ही सीरियल 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून केली होती.

याव्यतिरिक्त करिश्मा सलमान खानचा शो 'बिग बॉस'मध्येही दिसून आली होती.

करिश्माचे हे सर्व फोटो तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आले आहेत.