सचिनची 'सोनपरी' सारा, तिचा रुबाब न्यारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:47 PM2018-11-19T12:47:15+5:302018-11-19T13:24:44+5:30

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत राहणारा विषय... त्यामुळे त्याचे कुटुंबीयही चर्चेच्या गोतावळ्यात राहते. अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द हा तर हॉट टॉपीक.

परंतु सचिनची सोनपरी सारा ही सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग्जमध्ये आहे.

साराने इंस्टाग्रामवर मैत्रीणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सारा एखाद्या बॉलिवूड नायिकेलाही लाजवेल इतकी सुंदर दिसत आहे.

रुपापेक्षा तिच्या गळ्यात दिसणारे सोन्याचे लॉकेट अधिक लक्ष वेधत आहे. 'सारा' असे मराठीत लिहिलेल्या लॉकेटची चर्चा आहे.

तिला नुकतीच लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवी घेतली. त्यावेळीही तिने काही फोटो पोस्ट केले होते.

इंस्टाग्रामवर साराचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.