प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतात 'हे' कलर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:46 PM2018-10-25T17:46:12+5:302018-10-25T17:53:27+5:30

फेस्टिव्ह सीझन सुरू असून सगळेच जण शॉपिंगमध्ये व्यस्त आहेत. अनेक तरूणी आपले कपडे खरेदी करताना त्याच्या पॅटर्नसोबतच त्यांच्या कलर्सवरही लक्ष देतात. त्या नेहमी असे कलर्स सिलेक्ट करतात जे त्यांच्या स्किन टोनला मॅच करतील. परंतु अनेकदा त्या कोणता कलर सिलेक्ट करायचा याबाबत गोंधळून जातात. परंतु गोंधळू नका. असे काही कलर असतात जे सर्व प्रकारच्या स्किन टोन्सवर शोभून दिसतात.

ग्रीन कलर हा फ्रेशनेसचा रंग म्हणून ओळखला जातो. ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसू शकता.

अनेक तरूणी नेहमी असा विचार करतात की येलो कलर गोऱ्या रंगावरच खुलून दिसतो. परंतु यलो शेडमध्ये असलेला मस्टर्ड यलो कलर प्रत्येक स्किन टोनवर मॅच होतो.

पिंक कलर प्रत्येक मुलीवर खुलून दिसतो. यामध्ये प्रिंसेस लूक मिळण्यास मदत होते.

रॉयल ब्ल्यू कलर एक असा कलर आहे जो सर्व प्रकारच्या स्किन टोनवर सूट होतो.

ग्रीन कलरचा लाइट शेड सर्वांना परफेक्ट लूक देतो. हा प्रत्येक प्रकारच्या स्किन टोनवर सूट करतो.

एमरल्ड ग्रीन सर्व प्रकारच्या स्किन टोन्सवर सूट करतो.

सुदंर दिसण्यासाठी तुम्ही मरून कलरही ट्राय करू शकता.